शिमला – हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपने निवडणूक जाहीरनामा जाहीर केले आहेत. या जाहीरनाम्यात काँग्रेस आणि भाजपाने, महिला सक्षमीकरणासाठी दावे केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र महिला उमेदावारीत दुष्काळ दिसून येत आहे.
काँग्रेसने बुधवारी हिमाचल प्रदेशसाठीचा निवडणूक जाहीरनामा सादर केला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार वीरभद्र सिंह यांनी जाहीरनामा सादर केला. या जाहीरनाम्यात मनरेगामध्ये किमान मजुरी 350 रुपये आणि गरीब कुटुंबाच्या 50 हजार गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपसह 1 GB डाटा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 338 उमेदवारांपैकी 136 उमेदवार काँग्रेस आणि भाजपचे आहेत. यामध्ये दोन्ही पक्षमिळूनही 10 महिला उमेदवार नाही. 19 महिला उमेदवारांपैकी केवळ 9 महिला उमेदवार काँग्रेस आणि भाजप पक्षांच्या आहेत. 2012 मध्ये 459 उमेदवार निवडणूक रंगणात होते त्यावेळी महिला उमेदावा-यांची संख्या 34 होती. त्यापैकी 11 काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार होते. या वेळी काँग्रेसकडून 3 महिला उमेदवार तर भाजपने 6 महिलांना उमेदवार तिकीट दिले आहे. हिमाचल प्रदेशातील 50.26 लाख मतदारांपैकी 24.57 लाख महिला मतदार आहेत. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत जेथे महिला मतदारांचा निर्णय घेतात. अशा वेळी काँग्रेस आणि भाजपने माहिला उमेदवारांना डावलणे महागात पडू शकतं.
COMMENTS