राज ठाकरे- मुख्यमंत्र्यांची बैठक संपली, काय झाली नेमकी चर्चा ?

राज ठाकरे- मुख्यमंत्र्यांची बैठक संपली, काय झाली नेमकी चर्चा ?

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ बंगल्यावर दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित यालाही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेऊन गेले. यावेळी ठाकरेंनी फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना फेरीवाल्यांचा त्रास होत असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. यातच काँग्रेसचे संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत या वादात उडी घेतल्याने हा प्रश्न चिघळला आहे. याच मुद्यावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे संगण्यात येत आहे.

मुंबईतील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. डोंबिवलीतील कलेक्टर लँडच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याशी संपर्कही साधला. नजराणा शुल्क संदर्भातील अडचणी सोडवण्यास पुढाकार घ्या, असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर राज ठाकरे हे पक्षाची काय भूमिका जाहीर करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

COMMENTS