जेंव्हा महाराष्ट्राचे मंत्रीच देतात दारुचा खप वाढवण्याच्या टीप्स !

जेंव्हा महाराष्ट्राचे मंत्रीच देतात दारुचा खप वाढवण्याच्या टीप्स !

नंदूरबार – शहादामधील एका कारखान्याचे बॉयलर पेटवण्यासाठी जलसंदपा मंत्री गिरीष महाजन काल आले होते. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. एकतर दारुचा खप वाढवण्यासाठी त्यांनी टीप्स दिल्या. त्यासाठी महिलांच्या नावाचा वापर केला. चक्क दारुची नावे महिलांची ठेवा, दारुचा खप वाढेल असं चक्क मंत्रीमहोदयांनी सांगितले. त्यानंतर हा गमतीचा भाग आहे असं सांगत सावरासावरीचाही प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वक्तव्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. एकतर दारुसारख्या गोष्टीचा खप वाढवण्यास ते सांगत होते आणि त्यासाठी उदाहरणही चुकीचे दिले.

COMMENTS