हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 74% मतदान, 18 डिसेंबरला मतमोजणी

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 74% मतदान, 18 डिसेंबरला मतमोजणी

शिमला –  हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागांसाठी आज मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजेपर्यत 74 टक्के मतदानाची नोंद झाली.  18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातील 50 लाखांपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. सकाळी 8 वाजता मतदानाल सुरुवात होऊन 5 वाजता मतदान संपले.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात मुख्य लढत आहे. विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्रसिंग आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

 

COMMENTS