राज्यसभेच्या खासदारकीसाठी “या” पक्षाने दिली रघुराम राजन यांना ऑफर !

राज्यसभेच्या खासदारकीसाठी “या” पक्षाने दिली रघुराम राजन यांना ऑफर !

दिल्ली – राज्यसभेच्या तीन जागांसाठी पुढील वर्षी जानेवारीणध्ये तीन जागांची निवडणूक होणार आहे. दिल्ली विधानसभेत 66 जागा जिंकलेल्या आम आदमी पार्टी तीनही जागा सहज जिंकणार आहे. या तीन जागांपैकी त्यांनी एका जागेवर रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हरनर रघुराम राजन यांना उमेदवारी देऊ केली आहे. तसा प्रस्ताव आपतर्फे रघुराम राजन यांना देण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आपचा राज्यसभेचा प्रस्ताव अजून राजन यांनी स्विकारले नाही. आपच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर टाईम्स ऑफ इंडियाशी याबाबत माहिती दिली. राजन यांनी हा प्रस्ताव स्विकारला तर राज्यसभेचे आपचे नेतेपद देण्याची तयारीही पक्षानं केल्याची माहिती या नेत्याने दिली आहे.

इतर दोन जागांवरही पक्षाबाहेरील चांगली प्रतिमा असलेले नेते देण्याचा आपचा प्रय़त्न आहे. पक्षाचे नेते कुमार विश्वास हेही राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र केजरीवाल यांच्याशी त्यांचे संबंध चांगले नसल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही असंही त्या नेत्यांने सांगितले आहे.

COMMENTS