अखेर राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला मिळाली परवानगी, कोठे होणार सभा?

अखेर राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला मिळाली परवानगी, कोठे होणार सभा?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात सभेची घोषणा केली आहे. मात्र या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली  होती. त्यावर आज तोडगा निघाला आहे. 

ठाण्यातील गडकरी रंगायतन चौक, डॉ. मुस रोड येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. मनसे नेते आणि पोलीस अधिकाऱयांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मनसेला ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक बाहेर अशोक टॉकीज परिसरात  ही सभा आयोजित करायची होती. मात्र जास्त वाहतुकीचा रस्ता असल्याने कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली होती.  आता ही सभा गडकरी रंगायतन चौक येथे होणार आहे.

COMMENTS