कोपर्डी खटला निकाल; तीनही आरोपी दोषी, 21नोव्हेंबरला अंतिम निकाल

कोपर्डी खटला निकाल; तीनही आरोपी दोषी, 21नोव्हेंबरला अंतिम निकाल

अहमदनगर – कोपर्डी येथील बलात्कार आणि खून खटल्यातील तीनही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आता या गुन्ह्याप्रकरणी 21 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी होणार आहे. या आरोपींनी कट-कारस्थान करून गुन्हा केल्याचा आरोेप सिद्ध झाला आहे.

कोपर्डी प्रकरणातील संतोष भवाळ , जितेंद्र शिंदे,  नितीन भैलुमेला या तीनही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आले होते. तसेच  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व आरोपींचे वकील योहान मकासरे हे देखील न्यायलयात हजर होते. त्यानंतर न्यायलयाने या आरोपींना कट कारस्थान करून बलात्कार व खून केल्याच्या आरोपात दोषी ठरवले.
या निकालाच्या  पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्हा न्यायालयासह कोपर्डी गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी मराठा मूक मोर्चेकरांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आता 21नोव्हेंबर रोजी न्यायालय या दोषी आरोपींना कोणती शिक्षा सुनावणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

‘कोपर्डीच्या घटनेत न्यायालयाने तिन्ही आरोपीना दोषी मानले आहे. एका प्रकारे त्या भगीनीला आज न्याय मिळाला आहे, आपण त्या भगिनीला परत आणू शकत नाही. परंतु अशा नराधमाना शिक्षा मिळाल्यानंतर कोणी ही अशा अत्याचाराला धजावनार नाही आणि त्यामुळे कायद्याच्या भय आणि राज्य स्थापित होईल. न्यायालयाने या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. खटला तीव्र गतिने लढन्यासाठी उज्ज्वल निकम यांचे ही अभिनंदन करतो.’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

COMMENTS