सुपरस्टार रजनीकांतची जानेवारीत होणार राजकारणात ‘एंट्री’ !

सुपरस्टार रजनीकांतची जानेवारीत होणार राजकारणात ‘एंट्री’ !

तामिळ सुपरस्टार अभिनेता रजनीकांत जानेवारीमध्ये आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करेल, अशी माहिती त्याचे ज्येष्ठ बंधू सत्यनारायण राव गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे. ते रजनीकांत फॅन क्लबचे जिल्हा सचिव गांधी यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी धर्मापुरीमध्ये आले असताना बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना सत्यनारायण यांनी सांगितले की, रजनीकांत जानेवारीत आपल्या चाहत्यांसोबत चेन्नईमध्ये फोटो शूटचे आयोजन करणार आहे. त्यावेळी तो आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल आणि पक्षाबद्दल घोषणा करेल.

रजनीकांत 12 डिसेंबरला त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी घोषणा करणार नाही. परंतु, रजनीकांत आपल्या जन्मदिवशीच त्याच्या राजकीय प्रवेशाची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी गायकवाड म्हणाले की, देशात प्रत्येकजण रजनीकांतवर प्रेम करतो आणि जर तो राजकारणात आला तर लोकांसाठी नक्कीच चांगल्या गोष्टी करेल.

 

 

COMMENTS