गुजरातमध्ये प्रचारसभेत मध्येच मोदींनी थांबवलं भाषण !

गुजरातमध्ये प्रचारसभेत मध्येच मोदींनी थांबवलं भाषण !

 सूरत – गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. काल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरतमध्ये प्रचारसभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूरतजवळ नवसारीमध्ये प्रचारसभा होती. प्रचारसभेच्या जवळच मशीद आहे. पंतप्रधानाचं भाषण सुरू झाल्यानंतर काही वेळातच तिथे अजान सुरू झालं. त्यावेळी पंतप्रधानांनी काही मिनिटे आपलं भाषण थांबवलं. साधारण दोन ते तीन मिनिटे मोदींनी भाषण थांबवलं. ते तिथेच उभे राहिले. अजान संपल्यानंतर तीन मिनिटांनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली.

                    2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये मोदींनी असचं एक दोन मिनिटे अजानसाठी भाषण थांबवंल होतं. कोणाच्या पुजेला अडथळा आणणं मला आवडत नाही असं सांगत त्यांनी तिथेही दोन मिनिटे स्टेजवरच थांबून भाषणाला पुन्हा सुरूवात केली होती.            

COMMENTS