भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येचा आरोप असलेले त्यांचे भाऊ प्रविण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा दावा प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. उस्मानाबादमध्ये सारंगी महाजन एका मराठी चॅनलशी बोलत होत्या.
उस्मानाबादमधील वडीलोपार्जित जमीनीच्या वादावरुन त्या उस्मानाबादमध्ये आल्या होत्या.त्याचा वाद उस्मानाबादच्या कोर्टात सुरू आहे.ही जमीन मला मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत असाही आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.
न्यायालयात जेंव्हा जेंव्हा येते त्यावेळी माझ्यावर दडपण आणण्यासाठी गाडीभरुन गुंड आणले जातात. हे काम एक स्विय सहाय्यक करतो असाही आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. प्रवीण महाजन यांच्या मृत्यूबाबत आपण पुस्तक लिहिणार असून माधवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही सारंगी महाजन यांनी सांगितलं.
COMMENTS