“मतपत्रिकांद्वारे मतदान झालेल्या ठिकाणी भाजपला 15 टक्के तर ईव्हीएमने मतदान झालेल्या ठिकाणी भाजपला 46 टक्के जागा “

“मतपत्रिकांद्वारे मतदान झालेल्या ठिकाणी भाजपला 15 टक्के तर ईव्हीएमने मतदान झालेल्या ठिकाणी भाजपला 46 टक्के जागा “

लखनऊ – ज्या मतदार संघात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात आलं त्याच मतदार संघात भाजपला चांगली मतं मिळाली असून ज्याठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आलं त्याठिकाणी भाजपला खूप कमी मतं मिळाली असल्याचा आरोप समजावादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे.याबाबतचं ट्वीट अखिलेश यादव यांनी केलं आहे. ज्या भागात बॅलेट पेपरने मतदान झाले तिथे भाजपाने फक्त 15 टक्के जागा जिंकल्या आणि ईव्हीएम मशीनचा वापर झालेल्या भागात भाजपाने 46 टक्के जागा जिंकल्या असे अखिलेश यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.

मायावती यांनी शनिवारी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपरने मतदान झाले तर भाजपाचा पराभवच होईल असा दावा मायावती यांनी केला. जनता आपल्यासोबत आहे असा भाजपाचा दावा असेल तर त्यांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूक लढवावी. 2019 सालची लोकसभेची निवडणूक मतपत्रिकेद्वारे झाली तर मला पूर्ण विश्वास आहे कि, भाजपा सत्तेवर येणार नाही असे मायावती म्हणाल्या.

त्यानंतर लगेचच अखिलेश यांनी  जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निकालाचा डाटा टि्वटरवर शेअर केला आणि मायावतींच्या मागणीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले.या दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर फोडले.

COMMENTS