सांगली -राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चापाठोपाठ आता लिंगायत समाजानही महामोर्चाचं आयोजन केलं आहे. आज सांगलीत हा महामोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात देशभरातील लिंगायत समाजाबांधवांनी सहभाग घेतला आहे. विविध मागण्यांसाठी या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रसंत जगदगुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य हे करत आहेत.
नांदेड, लातूर, बेळगाव, हुबळीनंतर सांगलीतील या महामोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लिंगायत बांधव रस्त्यावर उतरले आहेत. तसेच या महामोर्चात देशभरातील जगद्गुरू, महाराष्ट्र, कर्नाटकातील आजी-मंत्री, लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय, धर्मीय बांधव, संघटनांनी सहभाग घेतला असून देशभरातील विविध पिठांचे जगद्गुरूंनी मोठ्या संख्येनं या महामोर्चात सहभाग घेतला असल्याचं पहावयास मिळतंय.
स्वतंत्र धर्म, आरक्षण अशा इतर मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर देशभरात तीव्र आंदोलनाचा इशारा या बांधवांनी दिला आहे. त्यामुळे या महामोर्चाकडे देशाचं लक्ष लागलं असून सरकार या समाजाच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS