एकनाथ खडसे यांच्या “या” फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा !

एकनाथ खडसे यांच्या “या” फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा !

जळगाव – सध्या सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांच्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोमध्ये एकनाथ खडसे हे तहसिलदारांच्या खुर्चीत बसले आहेत. तर तहसीलदार हे त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे. मुक्ताईनगरच्या तहसीलदार रचना पवार यांच्या खुर्चीवर खडसे बसले आहेत. तर त्यांच्या शेजारील खुर्चीवर तहसीलदार रचना पवार बसल्याचं दिसत आहे. या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

या फोटोमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. एकतर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. त्याची आचारसंहिता सुरू आहे. असं असताना हा प्रकार घडाल आहे. या प्रकरणाची तक्रार करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या तालुका अध्यक्षांनी दिला आहे. तसंच तहसीलदारांच्या खुर्चीचा एक मान असतो. घटनेतच तो दिलेला आहे. त्यामुळे त्या खुर्चीचा मान राखणं गरजेचं आहे. मात्र तो राखला गेला नाही हे फोटोवरुन दिसत आहे. आता त्या खुर्चीवर खडसे स्वतःहून बसले की तहसीलदारांनी त्यांना विनंती केली हे अजून स्पष्ट झालं नाही.

COMMENTS