९ जानेवारीपासून काँग्रेसची सरकारविरोधात ‘रथयात्रा’!

९ जानेवारीपासून काँग्रेसची सरकारविरोधात ‘रथयात्रा’!

मुंबई – राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, बोंडअळीमुळे शेतक-यांचे झालेले नुकसान वाढती महागाई, राज्यातील भ्रष्टाचार याविरोधात राष्ट्रवादीनं काही दिवसांपूर्वीच हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्यानंतर आता काँग्रेसही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसनं राज्यभर रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जानेवारीपासून ही रथयात्रा सुरु होणार असून कोल्हापुरातून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

काँग्रेसच्या या रथयात्रेची सुरुवात पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे या क्रमाने रथयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या रथयात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे. या रथयात्रेद्वारे फसलेल्या कर्जमाफी योजनेसह घोटाळेबाज मंत्री-आमदारांना पाठीशी घालण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. या रथयात्रेचा प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस मुक्काम असणार असून या रथयात्रेचा समारोप पुण्यात होणार आहे. या रथयात्रेत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

COMMENTS