जालना – जालना जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक चौधरी यांना महिलेच्या विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली. एका बड्या अधिका-याला विनयभंग प्रकरणी अटक झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यातही आलं. सहकारी महिला अधिकाऱ्याला आपल्या दालनात बोलवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी काल चौधरी यांना अटक करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक चौधरी यांच्या विरोधात जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी शहरातील कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल पोलिसांनी दीपक चौधरी यांच्या दालनातील cctv फुटेज हस्तगत केलं मात्र यातील घटनेच्या दिवशीच cctv फुटेज गायब असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं, दरम्यान पोलिसांनी येथील हार्ड डिस्क ताब्यात घेऊन त्याच्या बॅकअप च्या तपासणी साठी पाठवण्यात आलंय. cctv फुटेज गायब झाल्याने प्रकरणाच गूढ आणखीनच वाढलं आहे.
COMMENTS