सोयाबीन खरेदीची बोंबाबोंब, तुर खरेदीचा पत्ताच नाही, हमीभाव केंद्रं केवळ कागदावरच !

सोयाबीन खरेदीची बोंबाबोंब, तुर खरेदीचा पत्ताच नाही, हमीभाव केंद्रं केवळ कागदावरच !

उस्मानाबाद : गेल्या पाच वर्षात दुष्काळाने झटका दिल्यानंतर यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पिकपाणीही थोडफार बरं आलं. पण नेहमीप्रमाणे उत्पादन थोडं जास्त झालं की भाव पडतो, त्याचा अनुभव पुन्हा आला.

सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली आहेत. मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी केद्र सुरू करण्याचे धोरण शासनाने राबविले आहे. परंतु, सध्या सोयाबीनची खरेदी अगदीच दुरापस्त झाली आहे. शासनाच्या हमीभाव केंद्रावर ना सोयाबीनीच खरेदी केली जात आहे, ना तुरीची खरेदी सुरू झाली. सध्या तुरीची आवक बाजारात आली आहे, परंतु, खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू झालेली नाही. सोयाबीनचा हमीभाव तीन हजार 50 रुपये प्रतिक्विंटल आहे. शेतकऱ्यांकडून व्यापारी दोन हजार ते दोन हजार 200 रुपये खरेदी करताना शासनाने हमीभाव केंद्र केवळ कागदावरच सुरू ठेवले.

सध्या तुरीचा भावही चार हजाराच्या आतबाहेर आहे. तर तुरीची हमीभाव किंमत पाच हजार 500 रुपये आहे. त्यामुळे तुरीची हमीभाव
केंद्रावर खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाच्या लेच्यापेच्या धोरणामुळे शेतकरी खचला जात आहे. त्यामुळे विरोधी गटाकडूनही याबाबत आंदोलनाची दिशा ठरविली जात नसल्याने शेतकरी वर्गात
असंतोष आहे.

COMMENTS