उच्च शिक्षणसंस्थांमध्ये केवळ 4.9 टक्के मुस्लिम शिक्षक, हा त्यांच्यावरील सामाजिक अन्याय – सुधींद्र कुलकर्णी

उच्च शिक्षणसंस्थांमध्ये केवळ 4.9 टक्के मुस्लिम शिक्षक, हा त्यांच्यावरील सामाजिक अन्याय – सुधींद्र कुलकर्णी

देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुस्लिम शिक्षकांचं प्रमाण फक्त 4.9 टक्के आहे. देशातील त्यांची लोकसंख्या ही 14.2 टक्के आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यातील शिक्षकांचे प्रमाण कमी आहे. हा मुस्लिमांवरील सामाजिक अन्याय आणि भेदभाव नाही का ? असा सवाल ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी मुस्लिम, बिगर मुस्लिम आणि सरकारनं एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत असंही सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. द हिंदू या वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेत सुधींद्र कुलकर्णी यांनी हे ट्विट केलं आहे.

मनुष्यब विकास मंत्रालयानं नुकाताच उच्च शिक्षणाबाबतचा देशपातळीवरील सर्व्हे केला आहे. त्यामध्ये उच्च शिक्षण देणा-या संस्थांमध्ये मुस्लिम शिक्षकांची संख्या केवळ 4.9 टक्के असल्याचं पुढं आलं आहे. अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींच्या शिक्षकांचं प्रमाणही लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. अनुसुचित जातींची लोकसंख्या 16.6 टक्के आहे. तर त्यांच्यातील शिक्षकांचं प्रमाण हे 8.3 टक्के आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 8.6 टक्के आहे. तर त्यांच्यातल्या शिक्षकांचे प्रमाणे केवळ 2.2 टक्के असल्याचं पुढे आलं आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओपन कॅटॅगरीचे 58.2 टक्के शिक्षक असल्याची माहिती पुढे आली आहे. तर ओबीसी शिक्षकांचे प्रमाण 31.3 टक्के असल्याचं पुढं आलं आहे.

https://twitter.com/SudheenKulkarni/status/952182157908221953https://twitter.com/SudheenKulkarni/status/952182157908221953

 

COMMENTS