धक्कादायक, मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन तरुणानं टाकली उडी !

धक्कादायक, मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन तरुणानं टाकली उडी !

मुंबई – मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन तरुणानं उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हर्षल रावते असं या तरुणाचं नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हर्षल हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सेन्ट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान घटनास्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील दाखल झाले असून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हर्षल सुरेश रावते असं या तरुणाचं पूर्ण नाव असून तो पैठणमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.

दरम्यान हर्षलचं एक ओळखपत्र आमच्या हाती लागलं असून तो औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक म्हणून काम करत होता.

COMMENTS