अंजली दमानिया यांना तातडीने अटक करा, न्यायालयानं बजावलं वॉरंट !

अंजली दमानिया यांना तातडीने अटक करा, न्यायालयानं बजावलं वॉरंट !

रावेर – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना तातडीने अटक करण्याचं वॉरंट बजावलं आहे. सतत ७ ते ८ सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने रावेर न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी गुरुवारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनला त्यांना तातडीने अटक वॉरंट बजावले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला होता. त्यानंतर सुनावणीसाठी दमानिया सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांना तातडीने अटक करण्याचं वॉरंट न्यायालयानं बजावलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरणाचे आरोप केले होते.त्यानंतर त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता. परंतु या खटल्याच्या सुनावणीला त्यांनी सात ते आठ वेला गैरहजेरी लावल्याने न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी गुरुवारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनला त्यांना तातडीने अटक करण्याचे वॉरंटचे बजावले आहे. त्यामुळे दमानिया यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली असल्याचं दिसंत आहे.

COMMENTS