मुंबईकर चाकरमान्यांच्या पोटाची काळजी घेणारे डबेवाले म्हणजे मुंबई शहरातील श्रम संस्कृतींचे जिवंत उदाहरण आहे. मुंबईचा खरा विकास कोणी केला असेल तर तो कामगारांनीच, त्यांनी आपल्या कष्टाने मुंबईची उद्योग नगरी केली. या मुंबईच्या विकासामध्ये डबेवाले कामगारांचा ही खारीचा वाटा निश्चित आहे.
याची दखल मुंबई महानगर पालिकेने घेतली दि.29 डिंसेबरला 2016 रोजी डबेवाले संघटनेचे नेते मॅनेजमेन्ट गुरू कै. गंगाराम (बुवा) लक्ष्मण तळेकर यांच्या कार्याचा गौरव म्हणुन त्यांचे नाव भायखळ्यातील एका चौकाला मुंबईच्या महापौर सौ.स्नेहल आंबेकर यांचे हस्ते देऊन गौरव केला आहे. दुसरा डबेवाल्यांचा गौरव म्हणुन RPG अार्ट फाऊंडेशनच्या वतीने दोन महीन्या पुर्वी हाजीअली चौकात डबेवाल्याचे शिल्प (पुतळा) बसवला आहे.
COMMENTS