देवेंद्र फडणवीस यांना संरक्षण मंत्री करण्याची चर्चा निरर्थक – गडकरी

देवेंद्र फडणवीस यांना संरक्षण मंत्री करण्याची चर्चा निरर्थक – गडकरी

निवडणुकांनंतर केंद्रात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात संपन्न झालेल्या जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणुकीत आपली कार्यक्षमता सिद्ध केल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

केंद्रातील मोदींच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोहर पर्रीकरांच्या जागी स्थान मिळण्याबाबत सध्या जोरदार चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, चर्चा म्हणजे केवळ अफवाच असल्याचे आता स्पष्ट झाले होते. संरक्षण मंत्रीपदाचा मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारमध्ये फेरबदल होणार आहेत. त्यात फडणवीस यांना बालोवले जाईल असं भाकीत वर्तविण्यात येत होत. मुख्यमंत्री यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागू शकते. कारण राज्यात मराठा नेता देण्यावर भाजपचा प्रयत्न असेल, अशी जोरदार चर्चा होती.

मध्यतंरी विधानसभेत चंद्रकांत पाटील तुम्ही या राज्याची सूत्रे हाती घ्या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देतो, असे राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे पाटील मुख्यमंत्री होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार नाहीत, ही अफवा असल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS