नवी दिल्ली – काँग्रेस महाअधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदारी टीका केली आहे. भाजपचं अध्यक्षपद एका खुनी व्यक्तीकडे असून त्याला एकवेळ लोक स्वीकारतील. परंतु हेच जर काँग्रेसच्याबाबतीत घडलं असतं तर ते लोकांच्या पचनी पडलं नसतं कारण काँग्रेसबाबत लोकांचा खूप आदर असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप हा एका संघटनेचा आवाज आहे, तर काँग्रेस देशाचा आवाज असल्याचंही त्यावेळी राहुल गांधींनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी राहुल गांधींनी भाजपाची तुलना कौरवांशी केली असून अनेक शतकांपूर्वी कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरवांमध्ये मोठे युद्ध झाले होते. कौरव हे सामर्थ्यशाली व उन्मत्त होते. तर पांडव हे नम्र आणि सत्यासाठी लढणारे होते. तसेच भाजप आणि संघ हे कौरवांप्रमाणेच असून ते फक्त सत्तेसाठी लढत असल्याची टीकाही राहुल गांधींनी केली आहे.
COMMENTS