मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे भारताचे पंतप्रधान नसून ते गुजरातचे पंतप्रधान आहेत. तसेच त्यांचा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जमिनी बळकावण्याचा प्रयत्न असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच नाणार प्रकल्पाची जमीन आधीच गुजराती मारवाडी अशा परप्रांतीय लोकांना मिळते कशी? त्यांना हा प्रकल्प येण्याआधीच याबद्दल माहिती होती. त्यामुळे आधीच त्यांनी जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत असा आरोपही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. तसेच या सर्वांना प्रकल्प येण्याआधी माहिती होते. त्यामुळेच ते प्रकल्प येण्याआधी जमिनी खरेदी करतात असंही राज यांनी म्हटलं आहे.
.
दरम्यान न्यायमूर्ती लोया प्रकरणात सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला तो खूपच धक्कादायक असून आजकाल चौकशी करुनही न्याय मिळत नाही. अशी टीकाही राज यांनी केली आहे. पण सध्या चौकशीलाही किती न्याय मिळतो, हे दिसतंय.
परप्रांतियांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तसेच प्रकल्प येण्याआधीच ज्या परप्रांतियांनी जमिनी घेतल्या आहेत, त्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
COMMENTS