राहुल गांधी आणि शरद पवारांची गुप्त भेट !

राहुल गांधी आणि शरद पवारांची गुप्त भेट !

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत गुप्त भेट झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकांसंदर्भात आणि युतीसंदर्भात ही भेट झाली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा गुप्त भेट झाली असल्यामुळे चर्चेला उधाण आलं असून या भेटीत सध्याची देशातील परिस्थिती, कर्नाटक आणि 2019 ची लोकसभा निवडणूक आदी विषयांवर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. तसेच काही दिवसांमध्ये राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापन करण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या आघाडीसंदर्भात होणार्‍या चर्चेत शरद पवार यांचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसर्‍या आघाडीबाबत दिल्लीत विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांशी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्याशीही चर्चा केली होती.

 

COMMENTS