विरोधकांना अंधारात ठेवून सेना-भाजपची हातमिळवणी !

विरोधकांना अंधारात ठेवून सेना-भाजपची हातमिळवणी !

सोलापूर  आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. यानंतर अनेकवेळा शिवसेना भाजप सरकारवर टीका करत आहे. अशातच सोलापूर महानगरपालिकेत एकमेकांविरोधात असलेल्या सेना-भाजपनं विरोधकांना अंधारात ठेवून हातमिळवणी केली आहे. भाजपनं विषय समितीच्या सभापतीपदाच्या चार जागा तर शिवसेनेनं तीन जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपाने निवडणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे जागा बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केली आहे.

दरम्यान मागील वर्षीप्रमाणे सर्व विरोधक एक होऊन काही समित्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे किसन जाधव, बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी केला. परंतु त्यांच्या प्रयत्नाला एमआयएमचे तौफिक शेख यांनी प्रतिसाद दिला नाही तर विरोधी पक्षनेते कोठे यांनी सकाळी पाहू असं म्हणून वेळ मारून नेली. त्यानंतर कोठे भाजपसोबत आहेत हे समजल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाने निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

दरम्यान वर्षभरापासून सुरु असलेला सेना-भाजपचा वाद संपुष्टात आल्यानं पालिकेचा कारभार चांगला आणि नेटका करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितलंय.

COMMENTS