बंगळुरु – कर्नाटकाती काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमध्ये दरार पडली असल्याचं दिसून येत आहे. आघाडीत एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षे एकत्र सरकार चालविण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस-जेडीएस हे दोन्ही पक्ष पोटनिवडणुकीत एकमेकांविरोधात लढणार आहेत.२८ मे रोजी राजराजेश्वरी नगर मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस आमने-सामने येणार आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. मात्र, २२२ जागांसाठी निवडणूक झाली होती. राजराजेश्वरी नगर आणि जयनगर मतदार संघातील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाले. त्यामुळे येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. तर राजराजेश्वरी नगर मतदारसंघात बोगस मतपत्रिका मिळाल्याच्या कारणामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली. आता या जागेवर २८ मे रोजी मतदान होत आहे.
दरम्यान राजराजेश्वरी नगर मतदारसंघातून कोण माघार घेणार याची चर्चा होती. परंतु निवडणुकीला काही तास उरले असताना दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जेडीएस-काँग्रेस यांचे उमेदवार रिंगणात उतर असल्याने ही निवडणूक रंगणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान जेडीएसने जयनगर मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिलाय. मात्र, आरआर नगरमध्ये पेच कायम आहे. जेडीएसला येथून निवडणूक लढवायची आहे. जीएस रामचंद्र या उमेदवाला काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी जेडीएसची मागणी आहे. मात्र, काँग्रेसने तसे काहीही केलेले नाही. या मतदार संघातून मुनिराथन हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसने जेडीएसचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे या मतदारसंघातही काँग्रेस-जेडीएस आमनेसामने येतील असं बोललं जात आहे. या पोटनिवडणुकीवरुन काँग्रेस जेडीएसच्या आघाडीत मोठी दरार निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS