संघटित क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती !

संघटित क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती !

मुंबई –  संघटित क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती झाली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं केला आहे. वघ्या 7 महिन्यात 8 लाखांवर रोजगार निर्मिती झाल्याचा दावा करण्यात आला असून  देशात सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 या 7 महिन्यांच्या कालावधीत एकूण 39.36 लाख इतकी रोजगारनिर्मिती संघटित क्षेत्रात झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे. संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात रोजगारनिर्मिती 8,17,302 इतकी असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली असून कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) या कालावधीसाठीची जी आकडेवारी 21 मे 2018 रोजी जाहीर केली त्याच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. रोजगारनिर्मितीची ही आकडेवारी केवळ संघटित क्षेत्रातील असून, ज्या आस्थापनांनी ईपीएफओकडे खाते उघडले, तीच संख्या यात अंतर्भूत असल्याची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे. याशिवाय असंघटित आणि इतरही क्षेत्रात रोजगारनिर्मिती झाली असून ती संख्या याहून अधिक असल्याचा दावा सरकारनं केला आहे.

दरम्यान अवघ्या सातच महिन्यात महाराष्ट्राने 8 लाखांवर रोजगार संघटित क्षेत्रात निर्माण केले आहेत. याचाच अर्थ प्रत्येक महिन्याकाठी एक लाखाहून अधिक रोजगार राज्यात निर्माण होत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एकट्या महाराष्ट्रात 8,17,302 रोजगार निर्माण झाले असून, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूमध्ये 4,65,319 रोजगार निर्माण झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून, त्या राज्यात 3,92,954 रोजगार निर्माण झाले आहेत. हरियाणात 3,25,379 इतके रोजगार निर्माण झाले असून, पाचव्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकात 2,93,779 रोजगारनिर्मिती झाली आहे. दिल्ली सहाव्या क्रमांकावर असून तेथे 2,76,877 रोजगार निर्माण झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

COMMENTS