नितीन गडकरी यांच्या युतीच्या ऑफरवर रामदास कदम यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

नितीन गडकरी यांच्या युतीच्या ऑफरवर रामदास कदम यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

मुंबई – भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या युतीच्या ऑफरवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते युतीबाबत मीडियासमोर बोलले, पण जर त्यांनी याबाबत उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला असता तर योग्य झालं असतं असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. तसेच गडकरी म्हणतात वेगळा विदर्भ करण्याची भाजपची भूमिका आहे. मग महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणा-यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नसल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाची बैठक आणि निवडणुका वेगळ्या असतात. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे निवडणुकीच्या आजच्या मत्रिमंडळाच्या बैठकीवरही परिणाम झाला नसल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी शिवसेनेला युतीबाबत ऑफर दिली होती. परंतु ही ऑफर सर्वांसमोर न बोलता ती उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता तर योग्य झालं असतं असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कदम यांच्या म्हणण्यानुसार जर नितीन गडकरी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोर युतीची ऑफर ठेवली असती तर त्यांनी ती मान्य केली असती का ? असा सवाल आता पडू लागला आहे.

COMMENTS