भिका-यालाही घर विकत घेता येईल अशी घरं  नागपूरमध्ये बांधत आहे – नितीन गडकरी

भिका-यालाही घर विकत घेता येईल अशी घरं नागपूरमध्ये बांधत आहे – नितीन गडकरी

नागपूर – भिका-यालाही घर विकत घेता येईल अशी घरं मी नागपूरमध्ये बांधत असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच या घरांमध्ये गरम पाण्यापासून सोफा, बेड फुकट दिला जाणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली आहे. तसेच या घराची किंमत फक्त ३ लाख ५० हजार इतकी असणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या ऑडियो क्लिप बद्दलही मत व्यक्त केलं असून देवेंद्रला मी लहानपणापासून ओळखतो ते असं कोणावर कधी बोलणार नाहीत, तसा त्यांचा स्वभाव नाही. साम दाम दंड भेद म्हणजे सर्व ताकद लावा असा अर्थ होतो. त्याचा गैर अर्थ काढू नये असंही यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे. पोलघर पोटनिवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप सादर केली होती. त्यावेळी ही ऑडिओ क्लिप इडिट करुन सादर केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी फडणवीस यांच्याबाबत विश्वास व्यक्त केला असून ते असं बोलू शकत नाहीत असं गडकरींनी म्हटलं आहे.

COMMENTS