आमदारांच्या निलंबनानंतर विरोधकांचा विधीमंडळच्या पाय -यांवर मूक आंदोलन

आमदारांच्या निलंबनानंतर विरोधकांचा विधीमंडळच्या पाय -यांवर मूक आंदोलन

राज्याचा 2017-18 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होत असताना शेतकरी कर्जमाफीवरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील 19 आमदारांना नऊ महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आल्यानंतर आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांनी तोंडाला काळ्या फिती लावून विधीमंडळच्या पाय -यांवर मूक आंदोलन केल आहे. यात अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले आहे.

दरम्यान, सरकारने निलंबनाची कारवाई केली तरी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरुच राहील असं विधीमंडळाच्या आवारात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. यावेळी विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडत अनेक आरोप केले आहेत. अर्थसंकल्पांमध्ये अनेक चुका असून या चुका समोर येऊ नये यासाठी सरकारने 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाने सरकारवर केला आहे.

विधानसभेत अर्थसंकल्पाचा मंजुरी मिळणे गरजेचे आहे. आम्ही अर्थसंकल्पावर कपात सूचना मांडली असती तर त्यात सरकारचा पराभव झाला असता आणि हा पराभव टाळण्यासाठीच सरकारने 19 आमदारांचे निलंबन केले असे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणालेत,’ आमदारांचे निलंबन करूनही महाराष्ट्राचा आवाज सरकारला दाबत येणार नाही. तर जयंत पाटील यांनी सरकारने केलेली कारवाई दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हटलं आहे.

 

COMMENTS