मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, पोलिसांत तक्रार दाखल !

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, पोलिसांत तक्रार दाखल !

सोलापूर – मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागालेल्या घटकांचा विकास व्हावा आणि युवकांनी उद्योगाकडे वळावे यासाठी सरकारने गाजावाजा करीत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज व्याज परतावा योजना लागू  केल्याची घोषणा केली. मात्र या  योजनेतंर्गत कर्ज वाटपाचा कोणताही आदेश महाराष्ट्र सरकारने बॅंका किंवा महामंडळाला दिलेला नाही. केवळ अध्यादेश काढून समस्त मराठा समाजाची शासनाने फसवणूक केल्याचा आरोप  सोलापूरचा बेरोजगार युवक योगेश पवार यांनी पोलिसांत केली आहे. त्याने ही तक्रार ऑनलाईन पोलीस वेबसाईट वर केलीय. या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात मराठा समाजाचे मोठं मोठे मोर्चे निघाले. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण, शेतीमालाला किफायशीर भाव, बेरोजगारांना काम द्यावे यासारख्या विविध मागण्या या माध्यमातून करण्यता आल्या. आक्रमक झालेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी सरकरने आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगार मराठा युवकांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली. तसा अध्यादेशही काढला. त्यानुसार सोलापूरच्या योगेश पवार या मराठा युवकाने ऑनलाईन अर्ज भरला. आणि त्याने बँकेकडे कर्जाची मागणी केली. बँकांनी त्याची ही मागणी धुडकावली. त्यामुळे संतापलेल्या योगेश पवारने खोटे आश्वासन देत मराठ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यासह सहा मंत्र्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांविरोधात मराठा समाजाची फसवणूक केल्याची ऑनलाईन तक्रार योगेश नागनाथ पवार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात केली आहे. यासाठी 32 पानांची तक्रार आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सीडी तक्रारकर्त्याने जोडल्या आहेत. पोलिसांनी या तक्रारींवर योगेशचा जबाब घेतलाय. विधी खात्याशी बोलून पुढील कारवाईचे कळवले जाईल असे पोलिसांनी योगेशला सांगितलं आहे.

COMMENTS