…म्हणजे म्हैस पाच फुटांची आणि रेडकू पंधरा फुटांचे – छगन भुजबळ

…म्हणजे म्हैस पाच फुटांची आणि रेडकू पंधरा फुटांचे – छगन भुजबळ

पुणे तुरुंगातून सुटल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाषण केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल सभेची सांगता आणि पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीने आज पुण्यात भव्य हल्लाबोल सभा घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शंभर कोटींच्या कामात ८५० कोटींचा गैरव्यवहार केला म्हणता, म्हणजे म्हैस पाच फुटांची आणि रेडकू पंधरा फुटांचे असल्याचं वक्तव्य यावेळी छगन भुजबळ यांनी केलं आहे. माझ्या सुटकेसाठी मोर्चे काढण्यात आले, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा कंत्राटदारही मी नेमला नाही. म्हैस होती पाच फुटांची गाभण, आणि रेडकू निघालं 15 फुटांचं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. माझं सगळं जप्त केले पण लोकांचं प्रेम नाही जप्त करू शकत. तसेच आदरणीय न्याय देवेतेमुळे मी आज तुमच्या समोर बोलत आहे. न्याय देवतेवर विश्वास आहे, यापुढे सुद्धा लढून निर्दोष सुटेल, असा विश्वास यावेली भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

 

दरम्यान तुरूगातून बाहेर आल्यानंतर खायचं काय? असा प्रश्न पडला, पाहिलं तर सर्व कुटुंबाच्या खात्यात 15-15 लाख जमा भुजबळ यांनी भाजप सरकारवर लगावला आहे. दरम्यान पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे  लोकं घोडे घ्यायला लागले आहेत. पेट्रोल परवडत नाही. गाड्या सोडून घोड्याला भाव आला. सर्वांना नोकरी,घराघरात स्वस्त गॅस दिल्यामुळे केंद्र सरकारचे आभार. गेल्या चार वर्षात देशात एकही अत्याचार झाला नाही, सर्वत्र शांतता, नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला. स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर रुईनअप इंडिया येतंय असं वाटत असल्याचा टोलाही यावेळी भुजबळ यंनी लगावला आहे.

 आता गावात आत्महत्या होत नाहीत मंत्रालयासमोर होतात

या सरकारच्या काळात केवढे चांगले दिवस आले असून आता  शेतकरी आत्महत्या करत नाही, हमीभाव मिळतोय. आता गावात आत्महत्या होत नाही तर  मंत्रालयासमोर होतात. शेतकऱ्यावर कमी भावासाठी जबरदस्ती, शेतकरी रडताएत, पाकिस्तानची साखर आता यांना गोड लागत असल्याचा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे.

 आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली राष्ट्रवादी कशी सोडेल ?”

“माझं पूर्ण समर्थन, पाठिंबा मराठा आरक्षणाला होता. कुणीही सांगावं मी विरोध केला. इंदिराजींची आणीबाणी घटनेवर आधारीत होती, आताची आणीबाणी मात्र भीषण आहे. मराठा समाजाने समजून घ्यावं, तो मोठा भाऊ आहे. १७ टक्के आरक्षण उरलंय आणि ४०० जाती आहेत, कसं द्यायचं आरक्षण? आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली राष्ट्रवादी कशी सोडेल ?” असा प्रश्नही यावेळी भुजबळ यांनी  उपस्थित केला आहे. एकूणच भुजबळ यानी तुरुंगातून सुटल्यानंतर भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं असल्याचं दिसून आलं आहे.

 

COMMENTS