मुंबई – बुलढाण्यात पीक कर्जासाठी शेतक-याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारी संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात आहे तसेच संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही याबाबत संताप व्यक्त केला असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लज्जास्पद असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना समोर आही आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
बुलढाण्यात पीक कर्जाच्या बदल्यात शेतक-याच्या पत्नीकडे बँक अधिका-याने शरीरसुखाची मागणी केल्याची बातमी संतापजनक आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतक-यांवर एवढी वाईट वेळ कधी आली नव्हती ती भाजप सरकारने आणली. pic.twitter.com/Zx0NlSGthS
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 22, 2018
दरम्यान या घटनेमुळे अशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त केला असून अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. या प्रकरणातील बँक मॅनेजरसह त्याला मदत करणा-या शिपायावर अट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून केवळ गुन्हा दाखल करुन चालणार नाही, हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची मागणीही यावेळी चव्हाण यांनी केली आहे.
COMMENTS