पवारांच्या काटेवाडीत शिवसेनेकडून फडणवीसांचा निषेध  !

पवारांच्या काटेवाडीत शिवसेनेकडून फडणवीसांचा निषेध !

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेली बारामती आणि याच तालुक्यातील शरद पवारांचं गाव असलेल्या काटेवाडीत आपण अनेकवेळा राष्ट्रवादीचीच आंदोलनं पाहिली असतील. मग ते शेतक-यांच्या मागण्यासांठी असो वा सरकारविरोधातील आंदोलन असो. परंतु आज मात्र शरद पवारांच्या या काटेवाडीत आगळवेगळं आंदोलन पहायला मिळालं आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात आंदोलन केलं आहे.

दरम्यान दूध दरवाढीसाठी शिवसेनेनं फडणवीस आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धभिषेक घातला आहे. शरद पवारांच्या काटेवाडीत शिवसेनेनं हे आंदोलन केलं असून बारामती – इंदापूर रस्त्यावर दूध ओतून यावेळी सरकारचा निषेध केला आहे. त्यामुळे शिवसेनेनं पवारांच्या काटेवाडीत केलेल्या या आंदोलनाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

 

COMMENTS