नवी दिल्ली – आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसमधून कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं असून उमेदवारी निवडीसाठी आज काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत रात्री ९.३० वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अशोक गहलोत, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांपैकी काँग्रेस दोन जागा लढवणार आहे. दोन जागांसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छूक आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत, उपसभापती माणिकराव ठाकरे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती असून उपसभापती पदामुळे माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दुसर्या उमेदवारीसाठी नवीन नावावर चर्चा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज होणा-या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार असून या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS