मुंबई – संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड हे सध्या वादाच्या भोव-यात सापडले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता असं वक्तव्य आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हदरम्यान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायातून निषेध केला जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी वाररकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असून तुकाराम महाराजांबाबत असे बोलण्याचे धाडस त्यांनी केलेच कसे? असा सवाल वारकरी संप्रदायाने केला असल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने केली आहे.
दरम्यान या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यामुळे आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुकवरून हे वक्तव्य हटवलं आहे. मनु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ होता असे वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मनुस्मृतीचे दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. स्त्री उपभोगाची वस्तू आहे असे म्हणणारा मनू, जात व्यवस्था घट्ट करणारा मनू होता. तो तुकाराम महाराजांपेक्षा आणि ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे? संभाजी भिडे यांचे डोके फिरले आहे अशी टीका अव्हाड यांनी केली होती.
COMMENTS