‘विकास वेडा झाला’नंतर भाजपविरोधात काँग्रेसचा नवा नारा !

‘विकास वेडा झाला’नंतर भाजपविरोधात काँग्रेसचा नवा नारा !

रायपूर – विकास वेडा झालानंतर काँग्रेसनं आता भाजपविरोधात नवा नारा देण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकाराच्या विकास मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य करत उड गई विकास की चिडीया असा नारा देण्यास सुरुवात केली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपविरुद्ध टी-शर्ट वॉर सुरु केले आहे. या टी-शर्टवर उड गई विकास की चिडीया असा नारा लिहिण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आतापासूनच भाजपविरोधात मोहीम राबवली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान अशाप्रकारचं वाक्य लिहिलेले जवळपास 1 लाख टी-शर्ट काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटण्यात आले असल्याची माहिती आहे.तसेच राज्याल सर्व कार्यकर्त्यांना या टी-शर्टचं वाटप करण्यात येणार असून त्यासाठी 35 लाख टी-शर्ट छापण्याची ऑर्डर काँग्रेसनं दिली असल्याची माहिती आहे. दरम्यान भाजपकडून सातत्याने दावा करण्यात येणाऱ्या ‘विकास मॉडेल’वर काँग्रेने जोरदार टीका केली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या टी-शर्ट वाटपाच्या मोहीमेनंतर काँग्रेसला आगामी निवडणुकीत कितपत यश येणार हे पाहणं गरजेचं आहे.

 

COMMENTS