शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक एकवटले असून विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल संघर्ष यात्रा सुरु केली आहे. मात्र या यात्रेत विरोधकांनी स्वतःसाठी बंधनकारक केलेल्या आचारसंहितेचे पालन होते आहे का ? असा सवाल करत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे. यावर विनोद तावडेंना प्रसंगाच गांभीर्य नाही असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलयं.
अशोक चव्हाण म्हणाले, सत्तारूढ भाजपने आजवर प्रत्येक संवेदनशील प्रश्नावर गंभीरता दाखवण्याऐवजी विरोधी पक्षांची टिंगल टवाळी करण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी निघालेल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेवर भाजपने केलेल्या टीकेला आम्ही महत्त्व देत नाही संघर्ष यात्रेची बस वातानुकुलीत असल्याच्या मुद्द्यावरून भाजपने केलेली टीका म्हणजे कर्जमाफीच्या ज्वलंत मुद्द्यावरून राज्याचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न आहे. सरकारमधील विनोद तावडेंसारख्या मंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत आस्था असेल तर आपल्या गाडीतील आणि बंगल्यातील एसी बंद करून गावाखेड्यात जाऊन शेतक-यांचे दुःख जाणून घ्यावे
पाहा व्हिडीओ
COMMENTS