नवी दिल्ली – आगामी निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीदरम्यान कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये तीन महत्वाच्या समित्या स्थापन केल्या आहेत. समन्वय, प्रसिद्धी आणि जाहीरनाम्याची जबाबदारी या समित्यांकडे देण्यात आली आहे.
दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नऊ जणांची विशेष कोअर समिती बनवली आहे. ए.के.अँटनी, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल, जयराम रमेश, रणदीप सूरजेवाला आणि के. सी. वेणूगोपाल या दिग्गज काँग्रेस नेत्यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
तसेच राहुल गांधी यांनी प्रसिद्धीसाठी १९ नेत्यांची समिती बनवली असून या समितीचे निवडणूक काळातील प्रसिद्धीवर लक्ष असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा ही समिती तयार करणार आहे. राहुल गांधी यांनी तयार केलेल्या या समित्यांमुळे आगामी निवडणुकीत भाजपला तगडं आव्हान दिलं जाणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS