…तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला टोला !

…तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला टोला !

मुंबई – महाराष्ट्रातील सर्व केबल चालक, मालक संघटनांच्या सदस्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रंगशारदा सभागृह वांद्रे येथे मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सरकारनेही डिजिटल इंडिया सुरु केलं आहे. या डिजिटल इंडियात इंटरनेट फुकट मिळत आहे, त्यामुळे केबलही फुकट देण्याच्या घोषणा होताहेत. मात्र, त्यामुळे केबल व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जात आहे. ‘घरात रोजीरोठी नाही पण डिजिटल इंडियानं काय होणार माझ्या ताटात भाजी भाकरी काय आहे त्यांना पोट भरणार आहे. पण माझ्या ताटातलं काढून घेतलं तर कसं चालेल असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान जर तुम्हाला केबल फुकट द्यायचे असेल तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिओ फायबर सेवेविरोधात केबल मालक संघटना आक्रमक झाल्या असून याबाबत त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी केबल चालक, मालकांना पाठिंबा दर्शवला असून या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊ नका असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS