…तर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमवू – सुधीर मुनगंटीवार VIDEO

…तर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमवू – सुधीर मुनगंटीवार VIDEO

चंद्रपूर – वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमवू शकतो. ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो, असं मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या व्यक्तव्यावर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धवजी युती सरकारचे महत्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सुप्रीम कोर्टाच्या पाच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केलीच आहे. यात विनाकारण राजकारण केले जात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS