मुनगंटीवारांचे आव्हान शिवसेनेनं स्वीकारले ! VIDEO

मुनगंटीवारांचे आव्हान शिवसेनेनं स्वीकारले ! VIDEO

मुंबई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेलं आव्हान शिवसेनेनं स्वीकारले आहे. जे स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत त्यांनी उद्धव साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या वल्गना करू नयेत, मुख्यमंत्री महोदयांनी तशी घोषणा करावी.’उद्धव ठाकरे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमा म्हणजे सत्य काय आहे ते बाहेर येईल असं वक्तव्य शिवसेना प्रवक्त्या डॉ निलम गोग-हे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शासनाने नेमलेली चौकशी समिती हा फार्स असल्याची टीका केली होती. त्यावर आपण उद्धव साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमतो असे सुधीर मुनगंटीवार यानी जाहीर केले त्याबाबत प्रतिक्रीया देताना डॉ नीलम गो-हे बोलत होत्या.

उद्धव ठाकरे यांना वाघ आणि जंगल या दोन्ही विषयातील सखोल माहिती आहे. उलट ते टी 1 वाघिणीची हत्या कशी झाली याची सखोल चौकशी करतील आणि खऱ्या गुन्हेगारांना सगळ्यांसमोर आणतील, मात्र ज्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वाघिणीच्या हत्येचे आरोप आहेत आणि ज्यांच्या कार्यकर्तत्वाची चौकशी करण्यासाठी समिती नेमून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांनी उद्धवसाहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या वल्गना करू नयेत, हा अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या अधिकारांवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गदा आणत आहेत का ? असा सवाल करत शिवसेना प्रवक्ता डॉ नीलम गो-हे यानी वनमंत्र्यांवर पलटवार केला आहे.

 

COMMENTS