हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करुन ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक ?

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करुन ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक ?

नवी दिल्ली – गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. ते १२ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. तसेच पटेल यांना गुजरातमधील जामनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. सध्या जामनगर मतदारसंघाच्या खासदार भाजपाच्या पूनमबेन मादम या आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजपला धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी जोरदार आंदोलन केले होते. त्यांचं हे आंदोलन देशभर गाजलं होतं. या आंदोलनानंतर पाटीदार समाजाचा तरुण नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा पटेल यांना होणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे.

COMMENTS