‘या’ आठवड्यातली दुसरी मंत्रिमंडळ बैठक उद्या, महत्त्वाचे निर्णय घेणार!

‘या’ आठवड्यातली दुसरी मंत्रिमंडळ बैठक उद्या, महत्त्वाचे निर्णय घेणार!

मुंबई – या आठवड्यातली दुसरी मंत्रिमंडळ उद्या पार पडणार आहे. आचारसंहितेआधीची शेवटची मंत्रिमंडळाची बैठक असणार असल्यामुळे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून सर्व विभागाच्या सचिवांना जनहिताचे आणि लोकप्रिय अशा प्रलंबित निर्णयांची यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडणूक तोंडावर आल्यामुळे या बैठकीत राज्यातील जनतेला खूश करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जाणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी ही भेट होणार असल्यामुळे याकडे विशेष लक्ष लागलं आहे. या भेटीदरम्यान लोकसभा निवडणुकीसह उद्याच्या बैठकीत घेतल्या जाणाय्रा निर्णयांवर चर्चा केली जाणार आहे.

COMMENTS