मुंबई – नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याच जागेच्या मागणीवरुन सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपडून सुजय विखे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे आता सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान नगरचा उमेदवार ठरवण्यासाठी आज संध्याकाळी मुंबईत राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांची ही बैठक पार पडणार असून सुजय विखे यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी कंबर कसणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान नगर लोकसभेसाठी अरुणकाका जगताप किंवा प्रशांत गडाख या पैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून या दोघांपैकी एकाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.
COMMENTS