नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना रंगणार आहे. तसेच मध्य प्रदेशात गुना मतदारसंघातून डॉ. के. पी. यादव यांना काँग्रेसच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. तर सागर मतदार संघातून राज बहादूनर सिंह आणि विदिशा मतदार संघातून रमाकांत भार्गव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आजच भाजपात प्रवेश केला असून त्यांना लगेच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोपाळ मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार विजयी होत आहे. त्यामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्याचा भाजपला याठिकाणीयश येणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS