अजित पवार यांना डावलून विजयदादांना उपमुख्यमंत्री केले  – शरद पवार

अजित पवार यांना डावलून विजयदादांना उपमुख्यमंत्री केले – शरद पवार

पंढरपूर – माढा लोकसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नातेपुते याठिकाणी सभा पार पडली. यावेळी बोलताना माळशिरसमध्ये बोलण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचं पवारांनी म्हटलं. देशात अडचणीचा काळ असून चाळीस जवान हुतात्मा झाले. संघर्षाचं चित्र तयार होतय, याचा देशावर परिणाम होतोय.पंतप्रधान सांगतात छप्पन इंचाची माझी छाती, विनंती ही छाती किती इंचाची आम्ही मोजली नाही. चाळीस जवान हुतात्मा झाल्यानंतर चारशे मारतील असं वाटत होतं. अभिनंदनला आणलं पण, कुलभूषण जाधव तीन वर्ष झाले पाकिस्तानत आहे त्याला सोडलं नाहीत. कुठ गेली छप्पन इंचाची छाती असा सवाल पवारांनी केला आहे.

दरम्यान शेतीबाबत माहिती आहे पण त्यांच लक्ष साखर धंद्यावर असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. त्यावर पवार यांनी उत्तर दिलं आहे. साखर धंद्याला मदत करण्यासाठी माझं राजकारण आहे. विजयदादांचा साखर धंद्याचा संबध होता का नव्हता. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांची साखर कारखानदारी करताना माझे भाऊ अप्पासाहेब पवार यांनी हातभार लावला.जुन्या सहकाय्रांबद्दल मी वाईट बोलत नाही. असा टोला यावेळी विजयसिंह मोहीते पाटलांना त्यांनी लगावला. तसेच मोहिते यांच्या पतसंस्थेतील लोकांचे पैसे बुडले लोक माझ्याकडे आले. पण मी व्यक्तिगत आकस करत नाही. भाजप उमेदवार सुध्दा साखर कारखानदार असून मोदींच्या बाजूला बसले होते.मोदीच्या सभेत भीमा पाटस कारखानदार कांचन कुल होत्या. ज्यांच्या कारखान्यातील कामगाराचे पगार थकलेत असा टोला यावेळी पवारांनी लगावला. तसेच माझी चूक मदत केल्याची झाली असेल तर मान्य करतो असंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान माळशिरसमधील दहशतवाद गल्ली बोळातील असल्याची टीका मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाबाबत पवारांनी केली आहे. आता मी माळशिरस तालुक्याची जबाबदारी घेतली आहे असं आव्हान पवारांनी मोहिते पाटील यांना दिलं आहे.

अजित पवार यांना डावलून विजयदादांना उपमुख्यमंत्री केले

शंकरराव मोहिते पाटील यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचा आदर ठेवला.विजयदादांना मी संधी दिली. स्थिरीकरणासाठी भाजपात गेलो मोहिते पाटील सांगतात परंतु मी यांना काय काय दिलं. हे आठवतय का असा सवालही पवारांनी केला. बांधकाम मंत्री, ग्रामविकास खातं दिल, उपमुख्यमंत्री पद दिलं. अजित पवार यांना डावलून विजयदादांना उपमुख्यमंत्री केले. अनेकदा संधी दिली, मागच्या लोकसभा निवडणुकीत विजयदादांना खासदार केलं. एवढ सगळे दिल्यानंतर स्थिरीकरण सुचलं मग मोहिते पाटील एवढ्या सगळ्या सत्तेत इतकी वर्ष असताना का स्थिरीकरण डोक्यात आले नाही. असा सवालही पवारांनी यावेळी पाटील यांना केला. तसेच अंदर का मामला दुसरा असून स्थिरीकरण दाखवण्यासाठी असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

तसेच नव्या पिढीला संधी दिली. खासदार आमदार आलं. विजयदादांबद्दल तक्रार आली नाही पण पुढच्या पिढीच्या अनेक तक्रारी आल्यानंतर रणजितसिंह यांना बाजूला ठेवलं. दादांना हा निर्णय मान्य होता. दादांना राज्यसभेत यायचं असेल तर स्वागत होतं. पण त्यांनी मुलाला पुढ केलं ते मला मान्य नव्हतं. तसेच उपमुख्यमंत्र्याच्या घरात राहिलेला रणजितसिंह मुख्यमंत्री आणि महाजनच्या दारात उभा होता. ही लाचारी माझ्या पक्षात नाही असा टोलाही पवारांनी लगावला.

जन्मभर दादांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा विचार जगला. आज भाजपच्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसतात.
लक्ष्मण जगताप आमच्यासोबत होता. आमदार झाला पक्ष सोडला नंतर भाजपात गेले.एकदा त्यांचा फोटो आरएसएसच्या पोस्टरवर हाफ पँट, काळी टोपी घातलेला आला जगतापाची ही अवस्था झाली.
मला काळजी विजयदादांना हाफ पँट, काळी टोपी घातलेल पहायचं नाही. राष्ट्रवादी सोडली नाही म्हणता कुठल्या पक्षात जा पण हाफ पँट घालू नका. मला शंकरराव मोहिते पाटील यांना काय वाटेल याची चिंता आहे, आपली पिढी कुठ चालली.मा झी विनंती आहे विजयदादांनी या वयात पाय आणि उघड्या मांड्या बघायची वेळ आणू नका असंही पवारांनी म्हटलं आहे. तसेच आता मोहिते पाटील यांची पाठ खाली टाका माझी मतदारांना शपथ आहे. संजयशिंदे यांच्या पाठीशी रहा असं आवाहनही यावेळी पवारांनी मतदारांना केलं.

COMMENTS