तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मीही जय महाराष्ट्र म्हणतो, राष्ट्रवादीचा बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर ?

तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मीही जय महाराष्ट्र म्हणतो, राष्ट्रवादीचा बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे माजी मंत्री आणि सध्याचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. दिलीप सोपल यांनी याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मीही जय महाराष्ट्र म्हणतो असं सोपल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

दरम्यान दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी सोपल यांचे कुटुंबीय, प्रमुख कार्यकर्ते, बार्शी नगरपालिकांचे विरोधीपक्ष नेते यांच्यात बैठक पार पडली. यावेळी बैठकीत राष्ट्रवादीतून दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा की नाही. या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करावा ही भूमिका मांडली असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे आता लवकरच सोपल हे शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

COMMENTS