राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या रांगेत काँग्रेस आमदार, चर्चेला उधाण!

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या रांगेत काँग्रेस आमदार, चर्चेला उधाण!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये मोठे बदल होत असल्याचं दिसत आहे. अनेक नेते पक्षांत्तर करत आहेत. त्यामुळे कोणता नेता कोणत्या पक्षात जाणार आहे याचा अंदाज मांडण आता कठीण होत आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेना-भाजपात जात आहेत परंतु अशातच आता काँग्रेसच्या सोलापुरातील आमदार प्रणिती शिंदे या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांच्या मुलाखतीदरम्यान उपस्थिती लावली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत आमदार शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना चांगले मताधिक्‍य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी की नको या द्विधा मनःस्थितीत आमदार शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोहळमधून प्रणिती शिंदे या कोणत्या पक्षातून
पक्षातून निवडणूक लढवणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS