मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
1 ) अनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2) आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 254 अतिरिक्त विज्ञान शिक्षक नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
3) भिलार येथील पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता स्वतंत्र योजना म्हणून सुरू राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
4) लोकायुक्त कार्यालयासाठी उप प्रबंधक पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
5) गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी परताव्याच्या अधीन राहून देण्यात आलेली 61 कोटी रक्कम अनुदानात रुपांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
COMMENTS